स्वातंत्र्य ?

f
भारत हा पवित्र वचन बोलणाऱ्या व्यक्तींचा ओंगळवाणा देश आहे अस यदुनाथ तत्थे यांच्या भारत माझा कधी काही देश आहे ह्या पाठातलं अतिशय बोलकं आणि आपल्या देशाची आजची वस्तुस्थिती दर्शविणार हे वाक्य आहे. ओंगळवाणा म्हणजे घाणेरडा.आपण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा.वर्धापन दिन साजरा केला.पण ह्या विजयोत्सात आपला वाटा किती आहे?ह्याचा विचार कुणी केला का?आयते स्वातंत्र्य उपभोगणारे आपण,परिवर्तनाच्या वांझोट्या चर्चा करीत असतो मात्र सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी किती जपतो ? नुसता बदल व्हायला हवा अशी वल्गना आपण करतो आणि सरकारी यंत्रणेला शिव्या घालतो…..
मात्र आपल्याला नुसत निदर्शन करण्याशिवाय दुसर काही येत का? कहीही झालं कि केली निदर्शने,काडले मोर्चे,केली तोडफोड,मांडले ठीय्ये…..अरे बाबांनो डोकी फोडून क्रांत्या होत नसतात….डोकी बदलून बदल घडत असतो हि महापुरुषांची वाक्ये विसरलात का?
सरकारला दोष देणारयांनो सरकार तुम्हीच बसवलं ना? पार्ट्या खाऊन (काही महाभाग) मतपेट्या तुम्हीच भरल्या ना?मग भोगा आता आपल्या कर्माची फळ.निवडलेल्या विधयकावर बोट उचलता तेव्हा तुमची लोकशाही आणि बोटावर लागलेली शाही दिसते परंतु त्याचबरोबर निवडणुकीत बरबटलेले हातही लपले जात नाहीत हे लक्षात ठेवा.आणि मिडियाला वेळोवेळी मसीहा सारखं लेखू नका…कारण त्यातही लबाडांची संख्या वाढली आहे.आणि आमचा काय दोष म्हणानार्यांनो..! तुम्हीही भित्रे पणा सोडा जरा….हा देश तुमचाही आहे,नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका.तुमच्या वेतन वाढीला अंकुश लागला ना तेव्हा जाऊ नका मग संपावर.
दोष मी स्वताला देतो,स्वताच्या न्यूनगंडतेला देतो.देशाचा सुवर्णकाळ कधीचा संपलाय आता चालू आहे ती फक्त गुलामी तीही स्वकीयांची.कारण माझ्यातला स्वाभिमान मी कधीचा गहान टाकलाय.