हरभऱ्याची खमंग उसळ

साहित्य :-chana

१)      शिजवलेले हिरवे किंवा लाल हरभरे (मोड आलेले असल्यास उत्तमच)

२)     लसूण चार-पाच पाकळ्या

३)     आलं पाव इंच , अर्धा लिंबू

४)     कोथिंबीर पाव वाटी

५)    चाट मसाला दोन चमचे

६)      चाट मसाला नसल्यास धने-जिरे पूड व पादेलोण आवडीप्रमाणे

७)    तिखट आवडीप्रमाणे

८)     चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      हरभरे कुकरमध्ये चांगले मऊ शिजवून घ्या .  नंतर आलं-लसणाची पेस्ट करून त्यात चाट मसाला , कोथिंबीर , मीठ , तिखट मिसळून सर्व वाटण शिजलेल्या हरभऱ्याला नीट लावावं . 

२)     जेणेकरून प्रत्येक दाण्याला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे .  सर्व उसळीवर अर्धा लिंबू पिळून सारखं करा . 

३)     साखर आवडत असल्यास पाव चमचा साखर भुरभुरा . 

४)     कच्चा कांदा आवडत असल्यास वाढताना कांदा बारीक चिरून भेळेप्रमाणे त्यात घालून घ्यावा . 

५)    सकाळच्या नाश्त्यासाठी देखील हा पदार्थ चांगला आहे .  तेल वा फोडणी नसल्यामुळे कॅलरीजही कमी असतात .