हरभऱ्याच्या पाल्याची भाजी
साहित्य :-
१) हरभऱ्याचा कोवळा पाला
२) लसूण चार-पाच पाकळ्या
३) डाळीचं पीठ पाव वाटी
४) तेल पाव वाटी
५) मीठ चवीपुरतं
६) आवडीप्रमाणे तिखट
७) फोडणीचं साहित्य
कृती :-
१) हरभऱ्याचा पाला धुऊन बारीक चिरून घ्यावा . कढईत तेल गरम करून त्यात हिंगाची फोडणी करून घ्यावी .
२) लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात व चिरलेली भाजी , मीठ , तिखट घालून चांगली वाफ येऊ द्यावी .
३) भाजी अर्धवट शिजल्यावर पाव वाटी डाळीचं पीठ हळूहळू भुरभुरत व हलवत एकसारखं करत मोकळी भाजी होऊ द्यावी . ही भाजी अतिशय खमंग व सुंदर लागते .
Post Views:
3,617
Related Posts
-
राजस्थानी भरवा लौकी
No Comments | Jun 4, 2022 -
भरलेल्या मिरच्या
1 Comment | Jun 7, 2022 -
चुबक वाड्यांची भाजी
No Comments | Jun 7, 2022 -
कोथिंबिरीचा झुणका
10 Comments | Jun 7, 2022