हरवलेलं कुंकू
|सांर काही भकास,सगळीकडे शुकशुकाट
आवाज तेवढा पक्ष्याचा भेदरलेला किलकिलाट ………?
एका रात्रीत सांर काही संपल होत
आईच कपाळ कधीच ओस पडल होत.
डोईवरचा पदर आता तोडांपर्यंत आला होता.
ढसाढसा रडणंरयाना रात्रीत सुध्दा दिवस उजाडला होता.
मी मात्र गप्प होते काय घडल हे नीटस समजत नव्हत.
आई कुठे आहे हे विचाराचे धाडस देखील होत नव्हत.
आता सारे कसे मला एक तक पाहू लागले.
प्रत्येकाच्या डोळ्यात मात्र पानवधे उभे राहिले.
मी हि त्यांच्या सोबतीने ढसाढसा रडू लागलो.
इवल्याश्या मांडीवर बापाचं मंढ धरू लागलो.
काही क्षणात मांडीला कळ आली होती
परंतु आई अजुनही माझ्याकडे बघत नव्हती ……………?
उशिराने कळंल कि बापाच्या जाण्याने
आई शुद्ध हरपली होती.
आणि माझ नाव घेवून घेवून ती
अर्धमेली झाली होती.
बापाच्या जाण्यान उभ्या आयुष्याचा
वणवा पेटला होता.
आईच्या जिन्दगानीचा परमेश्वरान
खटका करून ठेवला होता.
आयुष्य भर सुख लाभंल नाही.
निदान म्हातारपणी तेरी लाभू दे
हेच होत तीच मागण
लाज कशी नाही रे वाटली देवा तुला
पती तुझा हवाय आहे मला
हेच तुंझ सांगण.
जन्मभराच रांडकपण कपाळावर कोरून
बाप शेवटच्या जत्रेला निघाला होता.
पुढे मी आणि मागे प्रेत भावना मात्र उरल्या होत्या.
बापाच्या प्रेत्यात्रेचा तो आठवणीतला शेवटचा दिवस होता.
एकट्याला सोडून बाप कधीच दूर गेला होता.
आठवणींच खान मात्र मागे सोडून गेला होता.
रोज आठवण यावी असे खूप प्रसंग होते.
पण हरवलेले कुंकू आता कधीच परत येणार नव्हते ……………?
– चैतन्य शेवाळे.