हराभरा कबाब
१) एक वाटी हिरवे हरभरे
२) अर्धी वाटी कोथिंबीर
३) एक उकडलेला बटाटा
४) पाव वाटी पुदिना दोन-तीन मिरच्या
५) पाच-सहा लसूण पाकळ्या
६) पाव वाटी बेसन
७) पाव वाटी किसलेला कांदा
८) ब्रेडचा चुरा , लिंबूरस
९) तळण्यासाठी तेल
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) हरभरे भिजत घालून (ओले असल्यास ताजे) मोड येऊ दयावेत . नंतर मीठ आणि लिंबाचा रस घालून प्रेशर कुकर मधून वाफवून घ्यावेत .
२) नंतर मिक्सरमध्ये भरड वाटावेत . बाकी सर्व जिन्नस एकत्र करून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून तळावेत . पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खायला दयावे .
Post Views:
3,968
Related Posts
-
गोड शिरा
No Comments | Jun 7, 2022 -
कच्च्या केळ्याचा कबाब मसाला
No Comments | Jun 6, 2022 -
पालक पुऱ्या
No Comments | Jun 6, 2022 -
मूग डोसा
1 Comment | Jun 7, 2022