हवी सहानुभूतीवृद्धांबाबत
|एकत्र कुटुंब पद्धती आता जवळपास नष्ट होत चालली आहे. त्याऐवजी पती-पत्नी आणि मुले अशी चौकोनी कुटुंबे वाढीस लागली आहेत. मुख्यत्वे आजच्या युवा पिढीकडे घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्यासाठी, दोन क्षण त्यांच्याजवळ बसून सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी वेळ नाही. एक प्रकारे दोन पिढय़ातील संवाद तुटत असल्याचे दिसत आहे. वृद्धांना छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी बरेच प्रयास करावे लागतात. तरुणांची मिनतवारी करावी लागते. वस्तुत: वयाच्या या टप्प्यात त्यांना प्रेमाची अतीव आवश्यकता असते. त्यांच्यासाठी एवढे तरी करूया!
1.सुट्टीच्या दिवशी काही वेळ त्यांच्या जवळ बसा. गप्पा गोष्टी करा. जुन्या आठवणीत दंग व्हा. त्यांच्या बरोबर एखादा खेळ खेळा. उदा. बुद्धिबळ, पत्ते इ.
2.रात्रीचं जेवण एकत्र घ्या. या वेळी घरातल्या वयस्कर व्यक्तींशी आपोआपच संवाद साधला जाईल.
3.काही गोष्टींमध्ये आवर्जून त्यांचा सल्ला घ्या.
4.महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या कानावर घाला.
5.वयस्कर व्यक्तींचे वाढदिवस लक्षात ठेवा आणि त्या दिवशी शुभेच्छा द्यायला विसरू नका. शक्य असल्यास त्यांच्या उपयोगाची वस्तू भेट म्हणून दिल्यास अधिक चांगले.
6.त्यांची एखादी बाब आवडत नसेल तरी कठोर शब्दात टीका करू नका. समजुतीनेही काही गोष्टी सुरळीत होतात