हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी……

strong manशरीराचा मुख्य आधार म्हणजे हाडे. हाडे मजबूत असणे शरीरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हाडांच्या मजबुतीसाठी काही महत्वपूर्ण उपाय खालीलप्रमाणे,

१)        हाडांची ठिसूळता टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

२)      संतुलित आहार, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नघटकांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

३)       शरीराला आवश्यक सूर्यप्रकाश मिळाल्यास हाडे ठिसूळ होण्याची समस्या उद्भवत नाही.

४)      वयाच्या पन्नाशीनंतर १ ग्रॅम कॅल्शिअम रोज घेणे आवश्यक आहे. मद्यपान व धूम्रपान टाळल्यास हाडांची ठिसूळता टाळता येऊ शकते.

५)      ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांनी उठून उभे राहताना पलंग किंवा सोफा आदींचा आधार घ्यावा. रक्तदाबाची औषधे घेताना सावधगिरी बाळगावी. त्यामुळे चक्कर येण्याची शक्यता जास्त असते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *