हिर्‍याचे दागिने घ्या पारखून .

diamond-jewelry-1सध्या हिर्‍यांच्या दागिन्यांची चलती आहे. सोन्याच्या अथवा चांदीच्या दागिन्यांपेक्षा हिर्‍याचे दागिने अधिक स्टायलिश आणि फॅशनेबल लूक देतात. मात्र हिरे खरेदी करताना विशेष काळजी घ्यायला हवी. काही सोप्या उपायाने हिर्‍याची पारख करता येते. सर्वप्रथम हिरे खरेदी केल्यावर जवाहिर्‍याने दिलेली पावती जपून ठेवावी. यात हिर्‍यांची शुद्धता, वजन, पारदर्शकता आणि कट्स याचे प्रमाणपत्र दिलेले असते. हिरा वर्तमानपत्रावर ठेवावा आणि खालची अक्षरे वाचण्याचा प्रय▪करावा. अक्षरे व्यवस्थित वाचता आली तर हिरा नकली आहे असे समजावे. हिरा हातात घेऊन त्यावर फुंकर मारा. फुंकर मारल्याने तयार होणारी वाफ हिर्‍यावर पाच सेकंदापेक्षा जास्त काळ टिकली तर हिरा नकली आहे असे समजायला हरकत नाही. हिर्‍याने काचेवर चरे पडायला हवेत. तेव्हा ही परीक्षाही करून पाहा. मात्र हिर्‍यावरही चरे उमटले तर तो नकली समजावा.