हिवाळ्यात सौंदर्यवृद्धिंकरिता टिप्स

Beauty-tips-for-girls-faceहिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. पाय पांढरे, रुक्ष दिसतात, टाचांना भेगा पडायला लागतात, तर हाताच्या त्वचेवर ओरखडे आल्यासारखे व्रण पडतात. चेहर्‍याच्या आणि मान्ेावरच्या त्वचेचा भागही काळपट दिसायला लागतो. या दिवसात दर २0 ते २५ दिवसांनी फेशियल करणे उपयुक्त ठरते. अनेकदा बिझी शेड्युलमुळे ठराविक वेळेत पार्लरला जाणे, ट्रीटमेंट घेणे शक्य होत नाही. अशावेळी घरगुती आणि बजेट टिप्स सौंदर्यवृद्धिंकरिता पुरेशा ठरतात.

1. हिवाळ्यात होणारी रुक्षता टाळण्याकरिता आंघोळीपूर्वी अर्धा कप दुधाने सर्वांगाला मॉलिश करा अथवा अर्धा चमचा व्हिनेगर आंघोळीच्या पाण्यात टाका. त्वचा कोरडी पडत नाही.

2. पिकलेल्या केळीचा अर्धा भाग वा दोन चमचे क्रिम होईल इतपत भाग घेऊन चेहर्‍याला मॉलिश करा. साधारणपणे दहा मिनिटे हा पॅक लावा. त्यानंतर धुवून टाका. आठवड्यातून तीनदा असा पॅक लावल्यास साधारण १५ दिवसांत चेहर्‍यातील बदल लक्षात येईल.

3. कोणत्याही कंपनीचे क्लिनजर घ्या. त्यात एक चमचा साखर मिक्स करा. दोन्हीची पेस्ट तयार झाल्यानंतर ही पेस्ट चेहर्‍याला, तसेच मानेच्या त्वचेवर लावा. साधारण १0 ते १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. फेशियलप्रमाणेच स्क्रब केल्याने त्वचा खुलते.

4. बेबी ऑईल आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण करून एका बाटलीत ठेवून द्या. जेव्हा जेव्हा चेहर्‍याचा मेकअप काढायचा असेल, मुख्यत्वे मस्करा, आयलायनर अशा ठिकाणी हे मिक्स तेल कापसाच्या बोळ्याने मेकअपच्या ठिकाणी फिरवा आणि नंतर मेकअप धुवून काढा. याचा साईड इफेक्ट नाही अन् मेकअपमुळे थोडी रफ होणारी त्वचाही या मिक्स ऑईलमुळे मऊ राहते.

5.ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येण्याकरिता दिवसातून किमान एकदा बिटचा वापर करा. बिट ओठांवर रगडा, ओठांचा रंग गुलाबी दिसेल.साधारण १0 मिनिटांनी धुवून टाका, असे आठ ते दहा दिवस केल्यास तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंग उजळलेला दिसेल.

6. केसांमधील कोंडा, केस गळणे, दुमुखी केस याकरिता उपाय म्हणजे अर्धा कप मध, २ चमचे ऑलिव्ह ऑईल, एक अंड्यातला फक्त पिवळा बलक यांचे मिश्रण करून ते तुमच्या केसांना लावा. साधारण अर्धा ते एक तास हे मिश्रण केसांवर राहू द्या. त्यांनतर कोमट पाण्याने, श्ॉम्पूने केस धुवा. फरक लक्षात येईल.

7.पुन्हा पुन्हा नेल पॉलिशच्या वापरामुळे नखे पिवळी पडलेली असतात. अशा नखांना लिंबू रसाने घासा, साधारण आठवड्यातून एकदा असे मॉलिश पाच ते सात मिनिटे केल्यास नखांना मूळचा पांढरा रंग मिळतो.
8.हिवाळ्यात हमखास टाचांना भेगा पडतात. यावर महागड्या क्रीम आणण्यापेक्षा घरीच ऑलिव्ह ऑईलचा उपाय करा. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल हातावर घ्या आणि टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी घासा. साधारण पाच मिनिटे असे मॉलिश करा. त्यानंतर पायात मोजे घाला.. सकाळी थोड्या कोमट पाण्याने पायाच्या टाचा धुवून काढा. एक आठवडा सलग हा उपाय केल्यास पायाच्या भेगा कमी झालेल्या आणि पाय मऊ पडलेले दिसतील.