हुंडाबळी
|म्हणजे असते हुंडाबळी
श्रीमंत व गरीब समाजात
रुजली हि रूढी||धृ ||
या हुंड्याच्या जाळ्यात
नवविवाहित तरुणी अडकते |
त्रासून सासरच्या छळाला
आत्महत्या ती करते ||१||
तेरी या जीवघेण्या हुंद्याविचायी
लोक अभिमान बाळगतात
हुंडा घेणारी हि माणस
प्रतिष्ठित का गणली जातात ||२||
श्रीमंत माणसाची हुंडापध्दती
गरीबापर्यंत येवून झिरपते
जेवढा हुंडा ज्यास्त
तेवढी प्रतिष्ठा वाढते ||३||
अशी स्वार्थी विचारसरणी
मला खालच्या स्तराची वाटते |
घरात येणारी नवीन सून
संपत्ती मिळविण्याच साधन नसते ||४||
खरतर राक्षसालाही लाजवेल
अशी हि कृती व वृत्ती असते
गडगंज पैशाच्या मोहात
एका स्त्रीची आहुती जाते ||५||
हुंडा घेणाऱ्या या नराधमाला
वधूपित्याने मुलगीच देवू नये
मुलीना उरावरचे ओझे न समझता
तिची गाठ कुणाशीही बांधू नये ||६||
– माधुरी मधुकर निंबाळकर