हृदयविकार टाळण्यासाठी…..

indexआजकाल हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात वाढले आहे. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे ३०% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. पूर्वी वार्धक्याकडे झुकल्यानंतर हृदयरोगाचा त्रास जाणवायचा. मात्र आजकाल ऐन तारुण्यातच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ओढविल्याच्या घटना घडत आहेत. ह्या आजारापासून दूर राहण्यासाठी काही फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे….

१)       कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वर्ज करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीने कांदा, लसूण, गाजर, वांगे, सोयाबीन, स्कीम मिल्क, दुधाचं दही,  सफरचंद या पदार्थांचा नेहमी आहारात वापर करावा.

२)     कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावेत. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टमाटा, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, मेथी, अशा भाज्या मोडीची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.

३)     चहा-कॉफीचा अतिरेक टाळावा. मांसाहार टाळावा. अंड्यातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ, मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे.  चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.

४)     मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरावे.