हृदयाला विचारा लक्ष बुद्धीला विचारा साधन .

हृदयाला विचारा लक्ष बुद्धीला विचारा साधना हृदयाला विचार आणखीन सिद्धी बुद्धीला विचारा पोहोचण्याचा मार्ग नेहमी हृदयाला विचारा काय हवे आहे आणि बुद्धीला विचारावे हवे आहे आता हे मिळवण्यासाठी काय करायला हवे? बुद्धी सांगू शकते मार्ग दाखवू शकते परंतु ती कधीही लक्ष नाही बनवू शकत .आणि आपण तर बुद्धीला लक्ष काय असे विचारून भटकत राहतो मार्ग चुकतो आपण जर हे रहस्य समजून घेतले तर आपले जीवन फार सोपे बनेल .

बुद्धीचा जोधरम विकास आहे तोच सायन्स द्वारे झाला आहे . हृदयाचा जो चरण विकास आहे तो धर्मा द्वारे झाला आहे .जर आपण सायन्सला असे विचारतो की आपण कशासाठी जगतो तर सायन्स असे म्हणेल आम्हाला ते ठाऊक नाही परंतु जर आपण सायन्सला असे विचारले की आपण कोणत्या प्रकारे जगलो तर जास्त जगू शकतो निरोगी राहू शकलो . तर सायन्स मार्ग आवश्यक दाखवेल जर तुम्ही सायन्सला असे विचाराल जीवनाचे लक्ष्य काय आहे तर सायन्स म्हणेल आम्हाला नाही सांगता येणार .

आईन्स्टाईन मृत्युसमयी हे दुखः व्यक्त करीत होता अणुबॉंब बनविण्यासाठी मदत केली आहे परंतु मला हे ठाऊक नव्हते की तुम्ही त्याचा काय उपयोग करणार आहात आम्ही शास्त्रज्ञ मंडळी एवढेच सांगू शकतो की अणुबॉंम कसा तयार करायचा आहे तुम्ही त्याचा काय वापर कराल याचा विचारही आम्ही केला नव्हता .

सायन्स हे नाही सांगू शकत की तुम्ही काय करावे धर्म हाच सांगू शकतो की काय करावे.सायन्स एवढेच सांगू शकते की कसे करावे “द हाउ” अर्थात कसे . परंतु कशासाठी फॉर व्हॉट ? या प्रश्नाचे सायन्स कडे कोणतेही उत्तर नाही बुद्धी जवळी याचे उत्तर नाही .

हृदयाला विचारा काय मिळवायचे आहे आणि नंतर मग बुद्धीला अशी आज्ञा द्यावी हे मिळवायचे आहेत मार्ग शोध पद्धत शोधून काढ व्यवस्था शोधून काढ . तेव्हा कोठे बुद्धी व हृदय यांचा संगम घडवून आणणे बुद्धी आणि हृदयाचा जेथे संयोग आहे . येथेच योग फलित होतो