हेअर डाय करताना घ्यावयाची काळजी..

         imagesवाढत्या वयाची लक्षणे वाढत्या वयासोबत्त प्रत्येकाच्या शरीरावर दिसू लागतात. केस पिकने अथवा पांढरे होणे त्यापैकीच एक! केस पांढरे झालेल्या प्रत्येकालाच पांढरे केस नको असतात. मग ते लपविण्यासाठी हेअर डाय करण्याचा विकल्प ते निवडतात. हेअर करतांना घ्यावयाची काळजी आम्ही खाली देत आहोत…

१)       हेअरडाय मध्ये केमिकल असल्याने तो वापरण्यापूर्वी कानामागे त्याची टेस्ट अवश्य घ्यावी.

२)     हेअरडाय करताना पांढरे केस झाकणे हे कारण असेल तर रंग निवडताना आपल्या केसांच्या रंगाला मिळताजुळता रंग निवडावा.

३)     घरात हेअरडाय लावताना हातात मोजे घालणे गरजेचे आहे.

४)     केसांचे छोटे छोटे भाग करून डाय लावावा, जेणेकरून सर्व ठिकाणी तो व्यवस्थित लागेल, यासाठी टेलकोम्बचा वापर करावा.

५)     डाय हा शक्यतो डोक्यावरील त्वचेला लागणार नाही, याची काळजी घ्यावी. डाय लावल्यानंतर फक्त पाण्याने केस धुवावेत. दुसर्‍या दिवशी श्ॉम्पू करावा.

६)      डाय केल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे आहे.