‘हैदर’ च्या चित्रीकरणातील तिरंग्याला विरोध….

index       आम्ही भारतीय मोठ्या अभिमानाने ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ असे मानत असलो आणि तसे आपले राज्यकर्तेही तसे छातीठोकपणे वारंवार सांगत असले तरीही भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला तिरंगा ध्वज स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनंतरही काश्मिरात फडकविण्यास बऱ्याच मर्यादा आहेत.

निर्माता दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘हैदर’ ह्या चित्रपटाचे चित्रीकरण ‘काश्मीर विद्यापीठात’ सरू होते. ‘लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ला’ ह्या प्रसंगाचे चित्रीकरण त्यावेळी सुरु होते. त्यामुळे साहजिकच लष्करी छावणीवर तिरंगा ध्वज फडकावणे आलेच. मात्र नेमकी हीच बाब तेथील विद्यार्थ्यांच्या फुटीरतावादी गटाला खटकली. त्यांनी चित्रीकरणस्थळी थेट मिरचा नेऊन चित्रीकरण बंद पडले आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणाही दिल्या. तसेच कलाकारांच्या तोंडून ‘जयहिंद’ ह्या शब्दावरही ह्या गटाने आक्षेप घेतला.

काश्मीर भारतात राहावे, तेथील जनता गुण्या-गोविंदाने सुरक्षित वातावरणात राहावी याकरिता भारतीय लष्कर आणि भारत सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र तरीही काही पाकिस्तान धार्जिण्या फुटीरतावादी संघटना काश्मिरी जनतेमध्ये भारताबद्दल नाहक अपप्रचार आणि द्वेष पसरविण्याचे काम करीत असतात. आपल्या राष्ट्रीय प्रतीकांनादेखील तिथे मज्जाव केला जातो. ‘हैदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणावरील हल्ला देखील याचेच उदाहरण आहे.

One Comment