होळी आधीच शिमगा

गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट सह मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस  होत आहे,ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या  घरी होळी आधीच शिमगा पेटला आहे. rain
राजान मारलं,पावसानं झोडपल, आणी आभाळच फाटलं तर दाद  . कुणाकड मागायची अशी परिस्थिती सर्वत्रच ओढवलेली आहे.
निसर्गाचा ढासळत जाणारा समतोल  त्यातून होणारं जीव जंतुंच नुकसान हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणुकींचे वारे सर्वत्र वाहत आहे त्यामुळे सर्व नेतेमंडळी पक्ष श्रेष्टींच्या मागे फिरण्यात मग्न आहेत,आचारसंहितेचे कारण देत नुकसान भरपाई बद्दल टोलवाटोलवी चालू आहे.
बहरलेलं उभं पिकं डोळ्यासमोर उध्वस्त होतांना शेतकऱ्यांचा तोंडातला घास पळाला आहे.
डाळिंब,द्राक्ष,आंबा ह्यांसारखी मोठी आर्थिक पिकं गळून पडली आहेत……।
निसर्गाच्या संकटाला रोखण शक्य नाही मात्र झालेल्या नुकसानाची दाखल मायबाप सरकारण घ्यावी आणि उध्वस्त झालेल्या बळीराजाला नुसता दिलासा नाही तर आर्थिक मदत दयावी. त्याने झालेल्या जखमा तर नाही भरणार मात्र थोड्याफार समाधानाची फुंकर नक्कीच मिळेल,
एवडीच माफक अपेक्षा…… !