ajcha

राष्ट्रीय सिने पुरस्कारात मराठी चित्रपटांची आणि कलाकारांची छाप पाहायला मिळाली. ज्यामध्ये “आजचा दिवस माझा’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे.

या चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावला.तर ‘यलो’ चित्रपटातील अप्रतिम भूमिकेबद्दल गौरी गाडगीळलाही गौरवण्यात आलं. गौरीला स्पेशल ज्युरी मेन्शन अॅवॉर्ड जाहीर झाला.

तसेच “तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला”ह्या गाण्याने सध्या तरुण मनावर भुरळ घातली आहे. ज्या सिनेमातील हे गान आहे त्या “फँड्री “ह्या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा मान देण्यात आला. तर या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनाची छाप उमटवणाऱ्या नागराज मंजुळे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक  गौरवण्यात आलं.