असा करावा तुळशी विवाह!

असा करावा तुळशी विवाह! 

Tulasi Vivah
Tulasi Vivah

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.

तुळशी विवाह कसा करावा?
* तुळशी विवाह तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
* मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
* चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
* यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
* यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
* मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
* यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
* नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
* नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
* शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *