मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा

पत्र योग्य ठिकाणी आणि वेळेवर पोहोचावे याकरिता भारतीय डाक विभागातर्फे ‘मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा’ ही योजना indian postआमलात  ठरविले आहे. बरेचदा अपुरा किंवा चुकीचा पत्ता लिहिल्याने पत्र किंवा बंद पाकीट वेळेत पोहोचत नाही किंवा परत जाते. पोस्ट खात्याकडून टपाल उशिरा मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व टाळण्याकरीता पत्र किंवा बंद लिफाफा पाठवीत असतांना त्यावर पत्त्यासोबतच मोबाइल नंबर लिहावा जेणेकरून टपाल वेळेवर आणि अचूक  हाती देण्यांस मदत होईल. भारतीय डाक विभागातर्फे ‘स्पीड पोस्ट सेवा’ही चालविली जाते. मात्र, ह्या सेवेत टपाल वेळेत आणि अचूक ठिकाणी पोहोचण्यांत अडचणी येत नाही, कारण पत्त्यासोबतच मोबाईल नंबर लिहिणेही ह्या सेवेत बंधनकारक आहे. यांच धरतीवर साध्या पोस्टनेही टपाल पाठवितांना पत्त्यासोबत मोबाईल नंबर लिहिल्याने टपाल वेळेत आणि अचूक ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल. याकरिता सीलबंद पाकीट किंवा अन्य पत्रांवर नागरिकांनी मोबाइल क्रमांक देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोबाइल क्रमांकावरून पोस्टमनला संबंधितांशी संपर्क साधता येणार असल्याचे पोस्टाच्या पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल एस. आर. मिना यांनी सांगितले.
संपर्क साधण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने पत्रे पोस्टमनकडून माघारी आणण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोबाइल क्रमांक दिल्यास संपर्क साधता येणे सोपे होणार असल्याचे मिना म्हणाले. पत्रांवर पिनकोड क्रमांक लिहिण्याची नागरिकांना सवय झाली आहे. त्यामुळे पत्रांची ठिकाणांप्रमाणे विभागणी करणे सोईचे होत आहे. त्याप्रमाणे मोबाइल क्रमांक नागरिकांनी दिल्यास पोस्ट सेवा आणखी वेगवान होऊ शकेल, असे मिना यांनी नमूद केले.
पत्र माघारी जाऊ नये तसेच नागरिकांना वेळेवर घरपोच पत्र मिळावे, यासाठी ही पोस्टाची योजना असून त्यामुळे घर बंद असल्याने पत्र माघारी जाण्याचे प्रकार टाळता येणार आहेत. पिन कोड क्रमांकाच्या जोडीला नागरिकांनी ​मोबाइल क्रमांक देणे पोस्ट खाते आणि नागरिक या दोघांच्याही हिताचे ठरणार आहे.