स्वदेशीचा अंगीकार करा आणि रुपयाचे अवमूल्यन थांबवा.

सध्या रुपयाचे झपाट्याने अवमूल्यन होत आहे. एका डॉलरसाठी तब्बल ६८ रुपये मोजावे लागण्याची नामुष्की सद्या देशावर येऊन ठेपली आहे.swadeshi
भारतीय रुपया सध्या आशियातील सर्वात कमजोर चलन ठरला आहे. निर्यातीच्या तुलनेत आयात जास्त असल्याने हि परिस्थिती उद्भवली आहे. ज्या आयात मालाचे आपण डॉलरने शुल्क अदा करतो त्यासाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात. परकीय चलन प्राप्त होण्याच्या तुलनेत रुपयाच जास्त खर्ची होत असल्याने देश अधिकच दुबळा बनत चालला आहे. यावर सरकार उपाय करो अथवा न करो आपण जनताही खारीचा वाट उचलून रुपयाचे अवमूल्यन अल्पप्रमाणात का होईना थांबवू शकतो. याकरिता स्वदेशीचा अंगीकार करणे जरुरीचे आहे. प्रत्येकाने आयात केलेली वस्तू न वापरता तिला पर्याय असलेली भारतीय बनावटीची वस्तू वापरण्यास प्राधान्य दिले तरीही आयात कमी होईल. आयात कमी झाल्यामुळे रुपया बाहेर जाणार नाही आणि त्याचे अवमूल्यन थांबेल.