आलू टिक्की
|
१) चार बटाटे , लिंबू अर्धा
२) चार ब्रेड स्लाईस
३) अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
४) चार ते पाच हिरव्या मिरच्या
५) दोन चमचे मक्याचे पीठ
६) थोडी हळद , तळण्यासाठी तेल
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत . ब्रेड पाण्यात टाकावा व लगेच पाण्यातून काढून दाबून घ्यावा मग टो बटाट्यात टाकून ते मिश्रण एकजीव करावे .
२) त्यात हिरवी मिरची बारीक चिरून , कोथिंबीर , हळद व लिंबू पिळून टाकावा . चवीनुसार मीठ टाकावे .
३) या मिश्रणाचे चपटे गोळे बनवून ते मक्याच्या पिठामध्ये घोळवावेत व तेलात तांबूस रंगावर तळावेत . चिंच चटणीबरोबर अथवा सॉससोबत गरम-गरम खावेत .
5 Comments
best….
zhatpat
aaj karoon pahanar aahe
mastach
mastach