अळूची भगरा भाजी

साहित्य :-alu chi bhaji

१)      अळूची पानं चार-पाच

२)     चिंचेचा कोळ

३)     तिखट

४)     ओलं खोबरं

५)    हरभरा डाळीचं पीठ किंवा भाजणी

६)      फोडणीचं साहित्य , तेल .

कृती :-

१)      अळूची पानं शिरा काढून बारीक चिरून घ्यावीत .  फोडणी करून पानं   वाफवावीत .

२)     त्यावर चिंचेच्या कोळाचं पाणी अर्धी वाटी शिंपडावं .  चांगली वाफ आल्यावर  मीठ , गुळ , तिखट घालून ढवळावं .

३)     थोडा रस सुटेल .  त्यावर डाळीचं पीठ वा साधी नेहमीची भाजणी पेरून ढवळावी .

४)     साधारण अर्धा ते पाऊण वाटी पीठ खपेल .  ओलं खोबरं घालून मंद आचेवर चांगल्या वाफा आणाव्यात .