पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ…

हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान दक्षिण कश्मीर मधील पवित्र अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ झाला.amarnath_yatra ते भगवान शंकराच्या प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक मानण्यात येते. ‘बम बम भोले’ च्या गजरांत खराब हवामानाची तमा न बाळगता सुमारे सहा हजार यात्रेकरू बलताल आणि नुनवान पहलगाम येथील तळांपासून अमरनाथ कडे मार्गस्थ झाले. ह्यांत महिला, लहान मुले आणि साधूंचा देखील समावेश आहे. खराब हवामानामुळे अडथळा आल्यास वा इतर काही धोका उत्पन्न झाल्यास मदतीसाठी पुरेशी सुरक्षा दले व मदत पथके या यात्रेकरुंबरोबर देण्यात आली आहेत. येथील तळापासून अमरनाथ येथे जाण्यासाठी केवळ सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी आवश्‍यक असणारा वैध परवानाधारक यात्रेकरुंनाच अमरनाथला जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. बलताल येथून अमरनाथ येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग असून येथून निघालेले यात्रेकरु दुपारपर्यंत अमरनाथ येथे पोहोचू शकतील.
           अमरनाथ येथे बर्फाचे शिवलिंग आहे. हे स्थान एका गुहेंत असून ह्या शिवलिंगाचे दर्शन गुरूपौर्णिमेपासून रक्षाबंधन पर्यंतच घेता येते. हाच अमरनाथ यात्रा काळ मानाला जातो. ह्या यात्रेवर नेहमीच दहशतवादाचे सावट असते मात्र तरीही  देशभरातून लाखो श्रद्धाळू दरवर्षी अमरनाथचे दर्शन घेतात. ही यात्रा अतिशय खडतर मानण्यात येते. 

One Comment