टिळा होळी खेळा पाण्याची बचत करा

save water 1
महाराष्ट्रात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे .  पाण्याचा साठा ३१% टक्यांच्या खाली गेलेला आहे .  त्याची तीव्रता आता दिवसागणित तीव्र होत आहे .
गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत .  एका Tanker चे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे .  शेतकरी उजाड झालेल्या शेताकडे पाहून खिन्न झाल्याचे चित्र दिसते .  असंख्य पक्षी व प्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरु झाली आहे .  अशा वातावरणात जेथे पाण्याची परिस्थिती बरी आहे , तेथील नागरिकांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे .  या परिस्थितीत धुलीवंदन आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये .  रंग खेळणे आपली संस्कृती आहे .  परंतु आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे .  पाण्याचा अपव्यय न करता यंदा धुलीवंदन , रंगपंचमीला फक्त रंगाचा टिळा लावून होळीचा आनंद घ्यावा .  अपायकारक , रासायनिक रंगापासूनही कटाक्षाने दूर राहिले पाहिजे .