एवरेस्टवर पाऊल ठेवणारी पाय नसलेली महिला…….

Everestएखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द मनात बाळगली आणि त्यादृष्टीने मनापासून प्रयत्न केला तर प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील ‘अरुनिमा सिन्हा’ हिने ही गोष्ट खरी करून दाखविली. अरुनिमा सिन्हा ही राष्ट्रीय स्तरावरील माजी व्हॉलीबॉलपटू आहे. दोन वर्षांपूर्वी लखनौ ते दिल्ली रेल्वेप्रवासात सोनसाखळी चोरांना प्रतिकार करीत असतांना त्यांनी तिला रेल्वेबाहेर फेकून दिले. बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने ती गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी तिचा जीव वाचविण्यासाठी तिचा डावा पाय कापून टाकला. तिचा जीव तर वाचला, मात्र खेळावर पाणी सोडावे लागले. आपल्याकडे दयेच्या नजरेने बघण्याची तिला चीड होती. यातूनच तिने जगातील सर्वोच्च्ह शिखर माउंट एवरेस्ट वर चढाई करण्याचा निश्चय केला. आणि काल तो पूर्ण करून दाखविला. पाय ठेवणारी पाय नसलेली पहिली महिला होण्याचा मान तिने मिळविला.

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *