बेसन पोळी

 साहित्य :-besan chilla1

१)      दोन वाटया डाळीचं पीठ

२)     तीन मिरच्या किंवा दीड चमचे तिखट

३)     पाच-सहा लसूण पाकळ्या

४)     अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट

५)    एक चमचा जिरं , पाव वाटी तेल

६)      दोन वाटया कणीक

७)    दोन वाटया पाणी

८)     चार चमचे तेल

९)      एक चमचा मीठ .

कृती :-

१)      दोन वाटया डाळीच्या पिठात मीठ घालावं .  मग लसूण , जिरं , मिरची व शेंगदाण्याचा कूट बारीक वाटून त्याचा गोळा या पिठात मिसळावा आणि दोन वाटया पाणी घालावं .

२)     आता कढईत पाव वाटी तेल घालून तापवावं .  त्यात हे मिश्रण ओतावं      आणि थोडं हलवून झाकण ठेवावं .

३)     दोन-तीन सणसणीत वाफा आणाव्यात व गार होऊ दयावं .  मिश्रणाचा       गोळा झाला पाहिजे .

४)     दरम्यान कणीक नेहमीप्रमाणे भिजवावी आणि तेल लावून मळून मऊ करून   घ्यावी .  मग पुरणाच्या पोळ्या करतो तशा उंडा भरून या बेसन पोळ्या करायच्या आहेत .

५)    फक्त बेसनाचा गोळा उंड्यात भरण्यापूर्वी तो कोरडया कणकेत घोळवून घ्यावा    व मग भरावा म्हणजे चांगला लाटता येतो .

६)      या पोळ्या बिडाच्या किंवा नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून खरपूस भाजाव्यात .