कोथिंबीरची वडी

साहित्य :-

१)      दीड कप बेसन

२)     अर्धा चमचा ओवा

३)     अर्धा चमचा तिखट

४)     पाव चमचा हळद

५)    कोथिंबीरची अर्धी जुडी धुवून बारीक चिरलेले

६)      एक चमचा लसूण पेस्ट

७)    तळण्यासाठी तेल

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यात मिक्स होईल इतके बेसनपीठ टाकून , मीठ , तिखट , हळद , लसूण पेस्ट टाकून हे मिश्रण एकजीव करावे .

२)     गरज वाटल्यास थोडे पाणी घेऊन ते कणकेप्रमाणे मळून घ्यावे .  त्याची गोल गुंडाळी करावी .  तो रोल केळीच्या पानावर तेल लावून त्यामध्ये गुंडाळावा व कुकरमध्ये किंवा मोदकपात्रामध्ये ठेऊन वाफवून घ्यावा .

३)     वाफवून घेतल्या नंतर वरचे केळीच्या पानाचे आवरण काढून आतील रोलचे गोलाकार चकत्या कराव्यात व तेलात सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्याव्यात .  खमंग लागतात .