आई – वडिलांचा धाक

 

fatherप्रसारमाध्यमातून होणाऱ्या नवनवीन धाडसी प्रदर्शनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे .  

एकूणच काय तर बिनधास्त जीवन शैलीकडे निघालेल्या किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिक जीवनातील समस्या वाढल्या आहेत .  याकरिता पालकांनी दक्ष राहणे जरुरीचे आहे .  मुलांमध्ये सुधारणा करण्याआधी पालकांनी स्वत: मध्ये सुधारणा घडविणे आवश्यक आहे .  आपल्यातील प्रत्येकाचेच भविष्य म्हणजे आपली मुले असून , देश आणि समाज सुधारायचा असेल तर मुलांना प्रेम करून त्यांना अवाजवी संरक्षण देवू नका .  त्यांना उन्हाची , धडपडण्याची , कष्टाची , भूक सहन करण्याची सवय असू दया .  मुलांना हाताळतांना संयम बाळगा .  त्यांचा राग करू नका .  त्यांना कोणत्याही गोष्टी ‘मी सांगतो म्हणून कर’ असे सांगण्यापेक्षा त्यामागील लॉजिक सांगा .
आपण सर्वांनी आपापल्या मुलांना सक्षम केले पाहिजे .  आदर्श पालक होण्यासाठी मुलांची काळजी घेऊन त्यांना वेळोवेळी होणाऱ्या मार्गदर्शनाने त्यांचे जीवनाचे नक्कीच सोने होणार आहे .