‘बोईंग सी-17 ग्लोबमास्टर-3′ भारतीय हवाई दलात दाखल

भारतीय हवाई दलाने आपल्या सामर्थ्यात वाढ करतांना जड वाहतूक करणारे बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर-३’ हे विमान आज आपल्या ताफ्यात दाखल केले.aero ‘सी-१७ च्या समावेशामुळे युद्धतंत्रामध्ये जगातील सर्वांत अत्याधुनिक अशा सामर्थ्यशाली देशांच्या पंक्तीमध्ये भारत जाऊन बसला आहे,’ असे एअर व्हाइस मार्शल एस.आर.के. नायर यांनी सांगितले. 
‘भारताच्या ताफ्यात सी-१७ दाखल होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील होतो,’ असे नायर यांनी बोईंगद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वर्षात चार आणि २०१४ मध्ये पाच अशी एकूण नऊ सी-१७ विमाने भारतीय हवाई दलाला देण्यात येणार असल्याचे बोईंगने सांगितले.