‘ब्राम्होस’ ची यशस्वी चाचणी…!

brahmos

दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ‘ब्राम्होस’ ह्या स्वनातीत क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वनातीत म्हणजे ध्वनीहूनही जास्त वेग असलेले. गोव्याच्या समुद्रात ‘तारकश’ ह्या नवीन युद्धनौकेवरून ह्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी ह्या क्षेपणास्त्राने अचूक लक्षभेद केल्याचीही माहिती मिळाली. भारतीय नौसेनेमध्ये सामील करून घेण्याच्या उद्देशानेच ही चाचणी घेतली गेल्याचे ब्राम्होस एअरोस्पेसच्या प्रमुखांनी सांगितले.

दरम्यान ब्राम्होस हे एक बहुउपयोगी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीवरूनही डागता करता येते. म्हणूनच हे भूदल, वायुदल आणि नौसेना ह्या तीनही दलांसाठी उपयुक्त आहे. ह्या क्षेपणास्त्रामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ‘ब्राम्होस’ हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून याचा पल्ला ३०० किलोमीटर अंतरापर्यंत आहे. आतापर्यंत ‘ब्राम्होस’च्या सर्व चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत.