चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून भावाचा केला खून
|इंडिया टुडे नेटवर्क ने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार , मुंबईत एका सराफ व्यापार्याच्या १३ वर्ष वय असणार्या मुलाला चक्क त्याच्या चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून नंतर पकडल्या जाण्याच्या भीती पोटी त्या मुलाचा खून केला .
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मृत मुलगा आदित्य रांका च्या चुलत भाऊ हिमांशू रांका (28) आणि त्याचा साथीदार ब्रिजेश सांगावी यांना काल या गुन्हा संबंधात अटक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आदित्यच्या वडिलांना एका पब्लिक बूथ वरून सोमवारी त्यांच्या मुलाच्या अपहरण बद्दल ३० लाखांच्या खंडणी साठी फोन आला आणि त्यांनी आपले नाव राकेश असे सांगितले
हिमांशू व ब्रिजेश ने IPL च्या सामन्यांवर बेट मध्ये लाखो रुपये गमावले होते आणि त्यांची भरपाई करण्यासाठी असा गुन्हा त्यांचाकडून घडल्याची कबुली त्यांनी दिली .