मनी उमटल्या अनेक छटा दडपलेल्या भावनांच्या कधी धूसर , कधी गर्द जीवनातील रंगाच्या . नजरेतुनच भाव कळे अंतरीचा कधी प्रेमाचा कधी क्रोधाचा झुकती नजरही बरेच काही सांगे
मोत्यांनी चमकते हिरवेगार शिवार कधी पाहायलाच मिळाले नाही राखाडा मातींत पडलेली धस्कट टोचत राहिली पायांना विव्हळत राहिलो वेदनांनी तरीही धरणाचा पाणी मिळाल नाही ते आले अनुदानाची भिक
सकाळ-सकाळी दोन्ही सुना आज लागल्या कल-कलू , गप्प बसलेले नवरे आता मधेच लागले बोलू . बोलता-बोलता हमरी-तुमरी बाचा-बाची वाढली , धाकय्यान मग एक नवीच युक्ती शोधून काढली
प्रेमात तुझ्या पडून सखे , वाटायचा जीवनात तरलोय मी, पण मन तुझ्या ताब्यात देऊनही प्रेमातच अधिक हरलोय मी . प्रेमातच पडल्यानंतर वाटायच प्रेमामुळे अधिक बहारलोय मी ,
प्रेम -ब्रेम प्रेम- ब्रेम ते काही नसते क्षणिक सारेच नाटक असते दोघांचाही स्वार्थ असते बदनाम ते त्यागा करते हृदयाशी उगा बंध जोडते मेंदूलाही कमी लेखते स्वप्नांचेच इमले रचते