चॅंपियन्स ट्रॉफी… चॅंपियन विना…..!

sachinआय.सी.सी. चॅंपियन्स ट्रॉफी येत्या ६ जून पासून सुरु होतेय. मात्र, सहा वर्षांनंतर भारतीय संघ सचिन तेंडूलकरविनाच मैदानात उतरेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खेळतांना बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांचे डोळे आसुसलेले असतात. मात्र एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती पत्करली असल्याने सचिन आगामी मालिकेतच नव्हे तर यापुढे कुठल्याही एकदिवसीय सामन्यांच्या दिसणार नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. ‘चॅंपियन्स ट्रॉफी होतेय,
मात्र त्यात चॅंपियन खेळतांना दिसणार नाही’ अशी भावना त्याच्या चाहत्यांमध्ये पसरलेली आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न बाळगले होते, जे त्याने पूर्ण करून दाखविले. एकापेक्षा एक सरस खेळी करत भारताला विजय मिळवून देत अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले. म्हणून त्याचे चाहते त्याला ‘चॅंपियन’ मानतात. दरम्यान चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये सलामीच्या लढतीत भारताला तगडा प्रतिस्पर्धी लाभलाय. भारताची सलामीची लढत येत्या ६ जून रोजी होत असून त्यात दक्षिण आफ्रिकेशी त्यांची गाठ पडेल.