चांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.

Chandpur Tourist Place in Bhandara Maharashtra
Chandpur Tourist Place in Bhandara Maharashtra

भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे अतिशय प्रसिद्ध व नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चंद्पुरचा समावेश होतो. चंदपुरात सुफी संत ‘हजरत चांदशाह वली बाबा’ यांची प्रसिद्ध दर्गाह आहे. त्यावरूनच ह्या गावाला चांदपूर असे नाव पडले. चांदपूर हे एक नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे.
चांदपूरजवळ मिनी दीक्षाभूमीदेखील आहे. चंदपुरात सुंदर असे हनुमान मंदिर व त्याखाली घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करते. चंदपुरात एक प्रसिद्ध जलाशय देखील असून त्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील खूप मोठी आहे. भंडारा शहरापासून चांदपूर ५३ किमी दूर असून तेथे बस किंवा खासगी वाहनातून जाता येते. रेल्वेने जाण्यासाठी तुमसर रोड रेल्वे स्टेशन पर्यंत जाता येते. जवळच नागपूर विमानतळ देखील आहे.