चवळीची उसळ

साहित्य :-chavali-usal

१)      मोड आलेली चवळी दोन वाटया

२)     काळा मसाला दोन चमचे

३)     कांदा एक , भरपूर कोथिंबीर

४)     लसूण तीन पाकळ्या

५)    आवडत असल्यास आंबट गोड चवीसाठी तीन-सर आमसूलं व गुळाचा खडा

६)      कढीपत्त्याची पानं दोन-तीन

७)    तेल चार मोठे चमचे

८)     फोडणीचं साहित्य

९)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      चवळी आधी दीड वाटी पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावी .  ही शिजवत असताना आधीच त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून , तसंच आमसूल           व गूळ टाकावा . 

२)     उसळ शिजवून झाल्यावर पातेल्यात फोडणी करावी व त्यात रस हवा असल्यास पाणी घालावं .  पाणी उकळल्यावर शिजवलेली उसळ घालावी .

३)     भरपूर कोथिंबीर व कढीपत्त्याची पानं घालावी .  आवडत असल्यास तिखट   घालावं .  (चवळी कुकरमध्ये फार वेळ ठेवू नये नाहीतर उसळीचा लगदा होईल .  दहा मिनिटं शिजवावं .  तसंच शिजवण्याच्या आधी त्यावर एक चमचा तेल घालावं म्हणजे दाणा दाणा सुटा राहतो .) 

One Comment