चेन्नई एक्सप्रेस मराठी समीक्षा

रोहित शेट्टीची भारत परिक्रमा चुकीच्या मार्गाने गेली असे वाटत तर होतेच पण ते चित्रपट बघितल्यानंतर खर ही वाटत . chennai_expressमहाराष्ट्रातील सिंघम , राजस्थान मधला बोल बच्चन आणि तिकडून दिल्ली किंवा पंजाबकडे ना जाता तामिळनाडू कडे धावलेली त्याची “चेन्नई एक्सप्रेस” चक्क रुळावरून घसरलेली वाटते .

चित्रपट बघताना आपण हा चित्रपट का बघतो आहे असा प्रश्न पडणे ही खूप वाईट गोष्ट आहे आणि आयुष्यातील २ तास २८ मिनटे आपण वाया घातल्याची जाणीव हा चित्रपट बघताना होते.

सिनेमा बघताना फक्त बोटावर मोजता येतील इतक्यांदा प्रेक्षकांना हसू येत ,  सिनेमाची अशी जमेची बाजू म्हण्याला काहीच नाही , ना मनोसक्त हसायला लावणारे जोक्स , ना संगीतात गोडवा वाटेल असे गाणे , आणि जशी रोहित शेट्टी दाखवतात तशी चक्क फाईट ही खूप कमी . तमिळ भाषेचा भरभरून वापर केल्यामुळे चित्रपट खूप वेळा आपल्या डोक्यावरून जातो आहे असे जाणवते त्यात तमिळ भाषा दक्षिण भागातील २-३ राज्य सोडले तर कुणी ऐकलेली पण नसते त्यामुळे काहीच कळत नाही , निदान हॉलीवूड चित्रपटांसारखे डबिंग तरी केले असते तरी काही तर भोवले असते . दीपिका पादुकोणची ती विचित्र हिंदी हसू येण्यासारखी तर मुळीच नाही उलट चित्रपट जसा जसा पुढे जातो तसे ते कंटाळवाणे वाटते . सुरुवातीचे काही १०-१५ मिनट सोडली तर चक्क तमिळ चित्रपट बघत असल्या सारख जाणवत . शाहरुखचं तास काही चुकलेल नाही वाटत , पण तो पण काय करणार त्याला पण कुठे कळते तमिळ भाषा ! शेवटी इतकेच म्हणेल की भारतासहित विदेशातील भरपूर साऱ्या ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच सिनेरासिकांची निराशा करणारा आहे.

4 Comments