चिकन मसाला
|साहित्य :-
१) एक चिकन किंवा अर्धा किलो ब्रेस्ट पिसेस किंवा लेग्ज पिसेस
२) तीन ते चार मोठे कांदे बारीक चिरलेले
३) दोन बटाट्याचे साल काढून मोठे तुकडे
४) एक टेबल स्पून वाटलेले आले-लसूण
५) तीन टोमाटो , कोथिंबीर
६) एक चाथुर्थांश चमचा हळद
७) दोन चमचे लाल तिखट
८) एक चमचा गरम मसाला
९) दोन लवंगा , एक तुकडा दालचिनी
१०) एक ते दीड वाटी तेल
११) दोन वेलच्या , चवीनुसार मीठ .
कृती :–
१) चिकनचे मोठे तुकडे करून घ्यावेत . तेलात लवंग , दालचिनी , वेलचीची फोडणी करून त्यात कांदा टाकावा .
२) त्या फोडणीला सारखे परतत राहावे . कांदा पारदर्शक तपकिरी रंगाचा झाल्यावर पाण्याचा थोडासा हबका मारावा म्हणजे कांदयाच्या रंग चांगला राहतो .
३) आले-लसूण , चांगले परतून मग टोमाटो टाकून पाच मिनिटे परतावे . लाल तिखट , गरम मसाला , मीठ टाकून चांगले परतून घ्यावे .
४) नंतर चिकनचे तुकडे , बटाटे टाकून बराच वेळ परतावे . मग झाकणावर पाणी ठेवून मंद शिजवावे . रंग छान येतो .
५) झाकणावरचे पाणी थोडे थोडे आत टाकावे . बेताचा रस्सा ठेवावा . चिकन वाढताना वरून कोथिंबीर चिरून टाकावी . हा चिकन मसाला सहा माणसांना पुरेल .
Wow !! Chicken Dishes