चिंच-खजुराची टिकाऊ चटणी
|१) अर्धी वाटी चिंच
२) शंभर ग्रॅम लाल बिनबियांचा खजूर
३) दीड वाटी गूळ
४) दीड मोठा चमचा तिखट (बडगी किंवा कश्मीरी )
५) एक मोठा चमचा धने-जिरंपूड
६) दोन मोठे चमचे रिफाइंड तेल
७) एक मोठा चमचा व्हिनेगर
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) चिंच आणि खजूर स्वतंत्रपणे धुऊन बेताच्या पाण्यात भिजत घालावेत .
२) चिंच कोळून घेऊन चिंचेचा कोळ आणि खजूर एकत्र बारीक वाटावं . त्यात गूळ चिरून घालावा .
३) जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात धने-जिरंपूड , तिखट आणि चिंच-गुळाचं मिश्रण घालून उकळावं .
४) चवीनुसार मीठ घालावं . मिश्रण घट्टसर झालं की , व्हिनेगर घालून चटणी उतरवावी .
५) पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरावी . पंधरा-वीस दिवस चांगली राहते . दही वडा , कचोरीबरोबर ही चटणी देता येते , किंवा याच चटणीत पाणी घालून थोडी पातळ करून ओली भेळ करता येते .
teasty
Nice
mast ahet padhartha
mast ahet padhartha