ओल्या नारळाचे पराठे

Sweet-Paratha-Recipe

साहित्य :-

१)      अर्ध्या नारळाचा चव

२)     एक वाटी कणीक

३)     एक वाटी मैदा

४)     तेल आणि तूप

५)    चार-पाच हिरव्या मिरच्या

६)      कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण

७)    एक चमचा साखर

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक वाटून घ्यावा .

२)     मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात वाटण , मीठ , साखर घालून दहा    मिनिटं घट्ट भिजवून ठेवावं .

३)     मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर छोटे पराठे लाटावे आणि      तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर खमंग भजावे .

४)     साखरेऐवजी दोन पेढे बारीक करून घातल्यास छान चव येते .