दही भेंडी

साहित्य :-dahi bhindi

 १)      भेंडी पाव किलो

२)     घट्ट दही दोन वाट्या

३)     बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी

४)     धन्या-जीऱ्याची पूड तीन-चार चमचे

५)    मीठ , तिखट आवडत असल्यास

६)      पण न घातल्यास भाजी छान दिसते

७)    तेल तीन मोठे चमचे

८)     फोडणीचं साहित्य .

 

कृती :-

 १)      भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घ्यावी .  भेंडी जास्त मोठी असल्यास दोन तुकडे  करावेत .  लहान असल्यास देठ आणि टोकाकडील भाग काढून टाकावा .

२)     भेंडीला उभी चीर देऊन त्यामध्ये धन्या-जीऱ्याची पूड , मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर , आवडत असल्यास तिखट यांचं मिश्रण भरावं .

३)     पसरट भांड्यात तीन चमचे तेलावर हिंगाची फोडणी करावी .  फोडणीत हळद न घातल्यास भाजीची रंगसंगती छान दिसते .

४)     भरलेली भेंडी तेलावर व्यास्थित शिजवून घ्यावी , शिजवताना ती हलवू नये .  चीर दिलेला भाग वरती ठेवावा .

५)    म्हणजे मसाला बाहेर येणार नाही .  पाच-सहा मिनिटांनी भाजी उतरवावी व गार होऊ द्यावी .

६)      वाढताना दोन वाट्या दही बाऊलमध्ये काढून त्यात चवीपुरतं मीठ , साखर आवडत असल्यास चवीपुरती घालून दही व्यवस्थित फेटून घ्यावं .

७)    भरलेली भेंडी या दह्यात घालावी .  वरून कोथिंबीर पेरावी .  पांढरं दही व हिरव्या भेंडया या रंगसंगतीमुळ पानाची शोभा वाढतेच .