दहीहंडी

दहीहंडीDAHIHANDI

दहीहंडी उभारली ती
श्रीकृष्णांनी त्या काळीही
समाजातील गोरगरीब अन
श्रीमंतांच्या एकतेचीही

आज बांधतो दहीहंडीच
आपण उत्साह अन पैशाची
माणसांच्याच मनोर्‍यागत
वाढणार्‍या त्या सर्व स्वप्नाची

दहीहंडी करून देते
आठवण सदा श्रीकृष्णांची
सांगितलेल्या तत्वज्ञानपर
ज्ञानियांच्या त्या गीतेची

दहीहंडी मुहर्त शुभ तो
फुटण्या हंडी दांभिकतेची
समाजात हया वाढणार्‍याच
सतत वाईट प्रवृत्तींची

दहीहंडी बांधावी तर
संस्कृती अन संस्काराची
पोह्चावया जिच्यापर्यंत
तरूणांचीच झुंबड व्हावी…

कवी- निलेश बामणे.