डाळ दलिया
|१) एक वाटी दलियाचा रवा शिजवून
२) अर्धी वाटी हरभरा डाळ
३) एक वाटी बारीक चिरलेला कांदा
४) पाच-सहा हिरव्या मिरच्या
५) आठ-दहा कढीलिंबाची पानं
६) साखर , हिंग , हळद
७) दोन मोठे चमचे दुध
८) एक मोठा चमचा लिंबूरस
९) फोडणीसाठी मोहरी
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) हरभरा डाळ तीन-चार तास भिजत घालून रात्रीच जाडसर वाटून फ्रीजमध्ये ठेवावी . तेलाची फोडणी करून त्यात मिरच्या , कढीलिंब परतून त्यावर कांदा घालून परतावा .
२) त्यात डाळ घालून परतावी . दलिया मोकळा करून घालावा आणि मीठ , साखर , लिंबाचा रस घालून ढवळावा . दुध घालून एक वाफ आणावी .
३) मायक्रोवेव्ह असेल तर भिजलेली डाळ दोन मिनिटं मायक्रो करा .
४) गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटली की सगळी सारखी वाटली जाईल .
५) चिकट न होता भगरा होईल . फोडणी गैसवर करून बाकी सगळी कृती मायक्रोवेव्हमध्ये करता येईल .