दलिया खिचडी

दमदार दलिया

दलिया म्हणजे गव्हाचा खूप जाडा रवा .  हा पोटभरणासाठीचा तसचं पौष्टीकही असतो .  नेहमीच्या रव्यासारखा हा भाजून शिजवला की थोडा तरी चावावा लागतो .  त्यापेक्षा न भाजता शिजवलेला दलिया मऊ तरीही मोकळा होतो .  त्यासाठी एक वाटी दलिया दुप्पट पाणी टाकून कुकरमध्ये भातसारखा उकडावा .  त्याच्याबरोबर एखादा बटाटाही उकडावा .  गार झाल्यावर दलिया मोकळा होतो .  हा रवा रात्रीच्या भाताबरोबर शिजवून ठेवला , की सकाळी हव्या त्या पध्दतीनं करता येतो .  एक वाटी दलिया साधारण चार माणसांना पुरेसा होतो .

Daliya Khichadi
Daliya Khichadi

 

दलिया खिचडी

 

साहित्य :-

१)      एक वाटी दालीयाचा रवा शिरवून

२)     अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

३)     तीन-चार हिरव्या मिरच्या

४)     एक मोठा चमचा साजूक तूप

५)    एक चमचा जिरं

६)      उकडलेल्या बटाटयाच्या फोडी एक वाटी

७)    मिठ , साखर , अर्धा कप दुध .

कृती :-

१)      तुपाची जिरं-मिरच्या घालून फोडणी करावी .  बटाटयाच्या फोडी घालून परताव्या .

२)     शिजवलेल्या दालीयात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट घालून कालवाव .

३)     हे मिश्रण बटाट्यात घालून ढवळावं .  दुध घालून एक वाफ आणावी .

 

One Comment