दलिया सांजा

साहित्य :dalia_upma

१)      एक वाटी दलियाचा रवा शिजवून

२)     एक वाटी बारीक चिरलेला कांदा

३)     अर्धी वाटी वाफवलेले मटार

४)     दोन मोठे चमचे तेल

५)    तीन-चार हिरव्या मिरच्या

६)      सात-आठ कढीलिंबाची पानं

७)    साखर , हिंग , हळद

८)     एक चमचा लिंबूरस

९)      फोडणीसाठी मोहरी

१०)  चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पानं घालून      कांदा परतून घ्यावा .

२)     मटार घालून परतावे .  त्यावर मीठ , साखर , लिंबाचा रस घालून       कालवलेला दलिया घालावा .

३)     यात गाजर , फ्लॉवर , फरसबी अशा वाफवलेल्या भाज्याही घालता येतील .