दातांची काळजी घेताना

Dental Care Tips in Marathi
Dental Care Tips in Marathi

कुठल्याही सौंदर्य स्पर्धा पाहताना प्रथम क्रमांकाच्या किंवा इतर सौंदर्यवतींचे मुकुट किंवा झगमगते कपडे पाहताना त्यांचे विलोभनीय स्मित मन आकर्षून घेते .  त्यांचे व्यक्तित्व त्यांच्या हसण्यातून प्रकट होताना दिसते .  स्वच्छ असे चमकते दात सर्वांचे मन मोहून टाकतात .

दात सुंदर , पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो .  पण दाताकडे लक्ष दिले नाही तर कोरीव ओठ व इतर मेकअप फिका वाटतो .  म्हणूनच दात चमकदार , पांढरेशुभ्र ठेवले पाहिजेत .

छान चवीचे पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतात , पण नंतर चूळ भरणे , माऊथवॉशने गुळण्या करणे , दिवसा व रात्री ब्रश करणे या साध्या व सोप्या गोष्टी करण्याचा आळस येतो .  काही छोटया गोष्टींची काळजी घेतली तर दात मजबूत , बळकट व चमकदार होतात .

१)      ब्रश काही महिन्यांनी बदलावा .  दंतवैद्याने सुचवलेला ब्रश वापरावा .

२)     हिरड्यांवरून हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा .  रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात .

३)     श्वास दुर्गंधी किंवा मूखदुर्गंधी पचन क्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे सुरु होते .  सारखा लवंग किंवा वेलची तोंडात धरण्याऐवजी दंतवैद्याकडे जाऊन उपचार करावे .

४)     दात किडणे , पडणे या गोष्टींसाठी घरगुती उपचार करू नये .

५)    फळे , स्यालड दातांना बळकटी देतात .  सफरचंद जेवणानंतर खाल्लं तर ब्रशप्रमाणे काम करत .  पौष्टिक घटक , लाळ जास्त सुटून दातांना लाभदायक करणे , आम्ल निर्जंतुकपणाचं काम करणे इ. साठी सफरचंद रोज खावं .  द्राक्षामुळे दात किडत नाहीत उलट हिरड्या व दात मजबूत होतात .

६)      पालक आणि गाजराचा रस पायरीया बरा करतो .

७)    आहारात कोंड्यासकट पोळी , भाकरी , भाज्या , फळे , दुध , दही घ्यावे .

८)     काही जरी खाल्ले तरी चूळ भरण्याची सवय लावून घ्यावी .

९)      मेकअप करण्याच्या आधी दात स्वच्छ घासावेत .

१०)  वर्ष-सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे .