क्रिकेट सोडून बाकी खेळांकडे होणारे दुर्लक्ष….
आम्हा भारतीयांना क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये जरासुद्धा रस उरलेला नाही.
थोडेफार हॉकी ह्या राष्ट्रीय खेळाकडे लक्ष असेल, मात्र इतर खेळांचे काय? इतर खेळांकडे कुणी फिरकतदेखील नाही, तर त्यात रस कसा निर्माण होणार?ह्या खेळांना नवसंजीवनी कधी मिळणार याचा विचार कधी केला गेला आहे कां? खरेतर याची सर्व जबाबदारी क्रीडा मंत्रालय तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाची आहे. जेणेकरून ह्या खेळांची माहिती अधिकाधिक लोकांपुढे येईल व ह्या खेळात देखील खेळाडू व प्रेक्षकवर्ग तयार होईल. क्रिकेट हा भारतीय मनावर अधिराज्य गाजविणारा खेळ असून ह्या खेळातून खेळाडूंना अमाप पैसा व प्रसिद्धी मिळते. बहुदा हेच याचे कारण असावे.ह्या खेळाला भारतातच नव्हे तर भारताबाहेरही करोडो चाहते लाभलेले आहे, त्यामुळे मैदानावर आणि मैदानाबाहेरही घराघरात दूरदर्शनद्वारे हखेल बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कुन्तही खेळाडूला प्रसिद्धी पावण्यासाठी हे वातावरण पुरेसे आहे. म्हणूनच अधिकाधिक खेळाडू ह्या खेळाकडे झुकलेले दिसतात. इतर खेळांच्या तुलनेत हा खेळ समजण्यास व खेळण्यास देखील सोपा आहे. त्यामुळे गल्लीबोळात नवनवीन खेळाडू आणि क्रिकेट टीम तयार होतांना दिसतात. इतर खेळांकडे होणाऱ्या दुर्लक्षास प्रसार माध्यमेदेखील कारणीभूत आहेत. योग्यरीत्या इतर खेळ लोकांपुढे पोहोचत नसल्याने इतर खेळांना चाहतावर्ग लाभत नाही, परिणामी प्रेक्षक मिळत नसल्याने खेळाडू देखील दुर्लक्ष करतात. क्रिकेटचे सामने वर्षाब हर प्रक्षेपित केले जातात, मात्र काहीप्रमाणात हॉकी सोडल्यास टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी, फुटबॉल अशा इतर खेळांना दूर्दार्षांवरील वाहिन्यांवर पाहिजेतसे स्थान मिळत नसल्याने हे खेळ लोकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी ह्या खेळांना प्रायोजक मिळत नसल्याने प्रसारमाध्यमेदेखील कानाडोळा करतात.
Related Posts
-
मुंडे-पवार क्रिकेटच्या मैदानात एकमेकांविरुद्ध…..
1 Comment | Oct 9, 2013 -
गतविजेते केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात…..!
No Comments | May 15, 2013 -
महाराष्ट्राचा विजय झोल भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाचा कर्णधार
1 Comment | Jun 17, 2013 -
वर्ल्ड कप शुटींगमध्ये हीना सिद्धूने रचला ‘सुवर्णअध्याय’…..
No Comments | Nov 11, 2013