अंड्याचे ऑम्लेट

अंड्याचे ऑम्लेट
अंड्याचे ऑम्लेट

साहित्य :-

१)      एक अंडे , एक मिरची

२)     १/२ कांदा

३)     थोडासा टोमाटो

४)     कोथिंबीर , तूप

५)    चवीनुसार मीठ .

कृती :

१)      अंडे फोडून चांगले फेसावे .  कांदा अगदी बारीक चिरावा .

२)     त्यात चिरलेली कोथिंबीर-मिरची व मीठ घालून कांदा चुरावा म्हणजे कांदा           नरम होऊन लवकर शिजतो .

३)     अंडे व कांदा एकत्र करून ढवळून घ्यावे .  तव्यावर किंवा फ्राइंग पैनमध्ये २ चमचे तूप घालून , तूप तापल्यावर अंड्याचे मिश्रण ओतावे व सगळीकडे सारखे पसरावे .  गैस मंद आचेवर ठेवावा .

४)     अंडे शिजले की , कालथ्याने वरची बाजू उलटावी म्हणजे दोन्ही बाजूने चांगले होईल .