अंड्याची भुर्जी

अंड्याची भुर्जी

साहित्य :-

१)      दोन अंडी , एक टोमाटो

२)     ओले खोबरे दोन चमचे

३)     अर्धा चमचा आले-लसूण

४)     अर्धा चमचा गरम मसाला

५)    १/४ चमचा लाल तिखट

६)      हळद , कोथिंबीर

७)    दोन कांदे बारीक चिरलेले

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      एक मोठा चमचा तूप टाकून कांदा चांगला परतून घ्यावा .  त्यात आले-लसूण गोळी टाकून परतावे .

२)     नंतर टोमाटो चिरून हळद , लाल तिखट , चवीला मीठ , गरम मसाला टाकून परतावे .

३)     नंतर फेसलेली अंडी हळूहळू टाकून एकसारखे ढवळत राहावे .  अंडे शिजले की खोबरे , कोथिंबीर टाकावी .