रविवार म्हणजे स्वर्गसुखाची अनुभती

             उद्या रविवार! आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी करणाऱ्यांच्या दृष्टीने रविवार म्हणजे मोकळा श्वास घ्यायला मिळालेली साप्ताहिक संधीच असते! sundayरोज बॉसची मर्जी सांभाळत काम करता करता आपले टार्गेट कसे पूर्ण होईल याचे आडाखे बांधतच अक्खा दिवस निघून जातो. सकाळी लवकर कामावर जाणारा माणूस रात्री उशिराने घरी येतो. एकाच घरात राहणाऱ्या बायको-मुलांनाही तो पारखा होऊन जातो. मुलांशी तर त्याचा संवादच दुर्मिळ होतो. ते शाळेत जातांना किंवा हा कामावर जातांना मुलांच्या ‘बाय’ करण्यालाही तो मुकतो. एकतर तो ऑफिसात जातांना मुले शाळेत किंवा झोपेत असतात, आणि कामावरून उशिरा परत आल्यावर मुले झोपी जातात. मुलांसाठी आणलेला खाऊही मग त्यांच्या आईलाच सकाळी मुले उठल्यावर द्यावा लागतो.

         यामुळे त्याचे आपल्या कुटुंबावर प्रेम नाही असे नाही. उलट कुटुंबावरील प्रेमापोटीच त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्थिक सूत्रे जुळविण्यासाठीच तो नोकरी करत असतो. मात्र आठवडाभराच्या ह्या व्यस्त दिनश्चर्येमध्ये ‘रविवार’ची तो चातक पक्षाहूनही अधिक आतुरतेने वाट पाहत असतो. ह्या दिवशी त्याला मानसिक-शारीरिक आराम तर मिळतोच, मात्र कुटुंबासोबत दिवस घालवायला मिळणार ह्या कल्पनेनेच तो मनोमन सुखावतो. काहींच्या दृष्टीने रविवार म्हणजे आठवड्यातील इतर वारांप्रमाणेच एक वार असेल, मात्र नोकरी करणाऱ्याच्या दृष्टीने त्यातही खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्याला रविवार म्हणजे स्वर्गसुखाची अनुभती देणारी पर्वणीच वाटत असते!     

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *