९० चा दूरदर्शन आणि आपण

९० चा दूरदर्शन आणि आपण , ही गोष्ट आहे त्यांच्या साठी ज्यांनी बालपण फक्त दूरदर्शन आणि मग हळू हळू वाढणाऱ्या वाहिन्यांचा प्रभाव वाढताना बघितला आहे .तर त्या काळी अशी काहीशी असायची रविवारची सुट्टी …..

1.रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो 1004808_537354616329985_953731306_n

2. सकाळी ७:१५ ला “रंगोली” मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची

3.”जंगल-बुक” बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची

4.शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं

5.महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे

6.”चंद्रकांता” पाट्या पासून सेवट पर्यंत बघायचं

7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर याचा विचार करत बसायचो

8.शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची

9.सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर खेळायला जायच

10. “मूक-बधिर” समाचार लागले कि त्यांची नक्कल करायची (आता वाटत हे चुकीचे करायचो पण ते बालपण होते ना ! )

11. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत बसायचं खाली अजून कुणाला तरी थांबवून टी.व्ही. दिसायला लागली कि नाही ते विचारायचे आणि पळतच आनंदाने खाली यायचे … खरच काही तरी वेगळेच होते ते सर्व काही .

ते दिवस नक्कीच परत नाही येणार आता आणि कदाचित येणाऱ्या पिढ्यांना हे अनुभवता ही येणार नाही .

6 Comments