डोळे स्वच्छ व चमकदार राहण्यासाठी काही खास गोष्टी

Eyes Care Tips in Marathi
Eyes Care Tips in Marathi

१)      संगणकावर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात .  अशा वेळी दर दोन ते तीन तासाने पाण्याचा हबका डोळ्यावर मारावा .  मग सुती कपड्याने किंवा रुमालाने       डोळे हलकेच टिपावे .

२)     हिरव्या झाडाकडे , फुलदाणीतील फुलांकडे आल्हाद दायक गोष्टीकडे मध्ये-मध्ये पाहावे .  डोळ्यांना प्रसन्न वाटते .

३)     काकडीच्या थंडगार चकत्या , मोगऱ्याचा गजरा , बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे .  फ्रीजमधील टी Bags ही ठेवता येतात .

४)     गाजराचा कीस , बीटाचा कीस , कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या आवती-भोवती हलका मसाज करावा .  डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *